आमदार नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, मुख्यमंत्री…

सिंधुदुर्ग । भ्रमर वृत्तसेवा : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Shivsainik Santosh Parab attack case) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना काल (9 फेब्रुवारी 2022) जिल्हा न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर आज नितेश राणे यांना कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच रुग्णालयातून सिंधुदुर्गात आलेल्या नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, पहिल्या दिवसापासुन म्हणजे १८ डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली, ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी मदत, माहिती हवी होती. सगळ्या तपासकार्यात मी सतात्याने मदत करत होतो आणि तशीच मदत या पुढेही जिथे जिथे पोलीस खात्याला तपास कार्यात माझी मदत लागेल. मला न्यायालायने ज्या अटी शर्थी लावून दिलेल्या आहेत. त्या सगळ्या अटी शर्थींचे पालन करून आणि चौकशी अधिकारी जेव्हा जेव्हा मला बोलावतील, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यात मदत मी कालही केली होती, आजही करणार आणि पुढेही करणार आहे. तसेच मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. मला जेव्हा जेव्हा फोन आले, जेव्हा जेव्हा माझ्याशी संपर्क केला गेला. तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, जात होतो, बोलत होतो तेव्हा माध्यमांनी देखील ते दाखवले आहे. कुठ्ल्याही तपासकार्यात मी कधी अडथळे आणले नाहीत, कुठली माहिती लपवली नाही. मला जी नोटीस मिळाली, जे काही प्रश्न विचारले ती सगळी माहिती जेवढी माझ्याकडे होती ती सर्व माहिती मी देत होतो. यापुढेही मी देणार आहे. असे नितेश राणे यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पोलिसांना सहकार्य करत होतो. पळण्याचा कधीही विषय आला नाही. पळण्याचा कुठलाही विषय आला नाही. मला पोलिसांनी अटक करण्याचीही गरज भासली नाही. ज्यादिवशी मी सरेंडर केले त्यादिवशी अजून चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण होते. पण तरीही एक दिवस अगोदर न्यायालयाच्या बाहेर घडले, माझी गाडी अडवण्यात आली. माझ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मी विचार केला की, सिंधुदुर्गातील जनतेला माझ्यामुळे कोणताही त्रास नको म्हणून मी माझ्या कुटुंबासोबत, वकिलांसोबत चर्चा करुन सरेंडर केले. मला पोलिसांनी अटक केलेली नाहीये असेही नितेश राणे म्हणाले.

याचबरोबर पुढे बोलतांना ते म्हणाले, माझ्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसे प्रश्न आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का? लतादीदींच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री गेले त्यावेळी कोणताही बेल्ट नव्हता. मग ते अधिवेशनावेळीच नेमके आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्याबाबत असे प्रश्न उपस्थित करणे कितपत योग्य आहे? राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो याचाही विचार करायला हवा असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!