Home महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

0

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित झाली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव  (Rajeev Satav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर उमेदवार ठरला आहे. रजनी पाटील (rajni patil) यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केला आहे.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित केली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान रजनी पाटील यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केले आहे. तसे पत्रकच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.  याआधी काँग्रेसकडून मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती.  मात्र अखेरीस रजनी पाटील यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.