राज्य सरकारमधील ‘या’ मंत्र्यांला दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

अमरावती । भ्रमर वृत्तसेवा : राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. याबाबत भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती.

बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये बच्चू कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता. तर बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते, असे स्पष्टीकरण बच्चू कडूंनी 2017 मध्ये दिले होते.

दरम्यान न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला असून २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच हे प्रकरण भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वे संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवत उघडकीस आणले होते .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!