शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (वय ४२  यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (ता.१७) घडली आहे.

काल सायंकाळी घरी सर्वजण असतांना रजनी कुडाळकर यांनी स्वतःच्या बेडरूममध्ये गळफास घेतला. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देत मृतदेह ताब्यात घेतला. रजनी यांनी हे टोकाचे पाऊल का घेतले हे अद्याप समजू शकले नाही.

मुंबई येथील कुर्ला भागातील नेहरु नगर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी या कुडाळकर यांची दुसरी पत्नी आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे नेहरु नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!