पुणे । भ्रमर वृत्तसेवा : भरलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून जात असतांना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॉली पलटी झाल्याने दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ऊसतोड कामगार घेऊन जात होते. यावेळी दोन बहिणी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसुन प्रवास करत होत्या याच दरम्यान ट्रॅक्टर उतारावर जात असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी झाली.
यावेळी या अपघातात जिजाबाई दुधवडे आणि भिमाबाई गांडाळ यांचा मृत्यु झाला. तसेच या दोघींमधील एका बहिणीचा जागेवरच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या दुसऱ्या बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणी मंचर पोलिसांनी आज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.