पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय जवानाची आत्महत्या

पुणे । भ्रमर वृत्तसेवा : भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने आत्महत्या (Army Jawan commits suicide) केल्याची धक्कदायक घटना पुण्यात घडली आहे. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून या जवानाने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख नानाभाऊ शेलार (Army Jawan Gorakh Nanabhau Shelar) असे या जवानाचे नाव असून गोरख शेलार यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये कार्यरत होते.

तर गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला. तसेच तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार त्याच्या सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गोरख याने आत्महत्या केली. आत्हत्येस प्रवृत्त केल्याने त्याच्या मृत्यूला माझ्या भावाची पत्नी अश्विनी, सासरा युवराज पाटील, सासू संगिता पाटील, मेव्हणा योगेश पाटील, मेव्हणी भाग्यश्री पाटील हे कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे गोरख यांच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान या आत्महत्या प्रकरणी गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांच्या तक्रारीवरून गोरख यांच्या पत्नी अश्विनी पाटील, युवराज पाटील, संगिता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) यांच्यावर पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!