आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

पुणे । भ्रमर वृत्तसेवा : शिक्षक पात्रता परीक्षेचे अनेक घोटाळेसमोर आल्यावर पोलिसांनी (police) कारवाई करत या घोटाळ्यातील महत्वाच्या आरोपीना काही दिवसांपूर्वी अटक (arrested) केली होती. यानंतर आता आरोग्य विभाग (Health Department) गट ‘ड’ परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखीच वेग आला असून पुणे पोलिसांनी (Pune Police) या पेपरफुटी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक (arrested) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन भरत राजपूत असे असून त्याला औरंगाबाद (Aurangabad) मधून अटक करण्यात आली आहे. आरोपी अर्जुन राजपूत हा औरंगाबाद या ठिकाणी म्हाडा (MHADA) परीक्षेकरिता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली आहे. त्यानंतर अर्जुन राजपूत याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान बोगस आरोग्य भरती प्रकरणात आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ९ आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप अनेक रॅकेट चालवणारे मोहरे खुलेआम फिरत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!