पोंडीचेरी (भ्रमर वृत्तसेवा) – मेघालय संघाला 118 धावांनी पराभूत करत महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. दरम्यान, नाशिकच्या माया सोनवणे हीला एका विकेटवर आज समाधान मानावे लागले.

बीसीसीआयतर्फे सीनियर महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत 187 धावा उभारल्या. त्यानंतर मेघालयाचा संपूर्ण संघ 69 धावांमध्ये बाद झाला. एक पाठोपाठ एक फलंदाज झटपट माघारी परतले. मेघालय तर्फे रुबी छत्रीने सर्वाधिक 22 धावा केल्या. इतर फलंदाज फार काही करू शकले नाही. नाशिकच्या माया सोनवणेने 4 षटकांमध्ये 20 धावा देत एक गडी बाद केला. दरम्यान, आजही ईश्वरी सावकार हिला सीनियर संघात पदार्पण करण्याची संधीची वाट पाहावी लागली तर प्रियंका घोडके हिला विश्रांती देण्यात आली.

तत्पूर्वी पहिल्या सामन्यात आंध्रप्रदेश संघाकडून पराभुत होणाऱ्या महाराष्ट्राने दुसरा सामना जिंकला होता. आज तिसऱ्या सामन्यात मेघालय विरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग करत 20 षटकात चार बाद 187 धावा केल्या. सलामीचे फलंदाज एस. एस.शिंदे सहा चौकारांसह 31 धावा केल्या, तर कर्णधार स्मृती मानधना हिने 27 चेंडू मध्ये 37 धावा केल्या. हसबनीस हिने अर्धशतकी खेळी केली. तिने 36 चेंडूंत 54 धावा केल्या. त्यात 11 चौकार ठोकले. मगरे हिने 26 धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्राला 20 षटकात चार बाद 187 धावा करता आल्या.