मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):– टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सरसोबत यशस्वी लढा दिला आहे. महिमा चौधरीने आपण ब्रेस्ट कॅन्सरमधून मुक्त झाल्याची माहिती दिली.
अभिनेता अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर करत महिमाला आपला ’हिरो’ असे संबोधले आहे. अभिनेत्री सध्या बरी होऊन सेटवर परतल्याचे उघड झाले आहे.
वय हा केवळ एक आकडा आहे असे म्हटले जाते. हे अनुपम खेर यांच्याबाबत तंतोतंत लागू होते. या वयातसुद्धा अनुपम खेर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. ते सतत विविध चित्रपट, वेबसीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तसेच अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतात. किंवा अनेक लक्षवेधी पोस्ट करत असतात. आजसुद्धा असेच काहीसे झाले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.