नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक महिला प्रिमियर लिगच्या स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला.
पहिल्याच सामन्यात नाशिक सुपर किंग्जची कर्णधार तेजस्विनी बटवाल हिने नाबाद शानदार शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करणार्या नाशिक सुपर किंग्जने 20 षटकात 2 बाद 194 धावा केल्या. तेजस्विनी बटवाल हिने 66 चेंडू खेळत 20 चौकारांच्या सहाय्याने 112 धावा केल्या. तिला कार्तिकी देशमुख हिने छान साथ दिली. तिने नाबाद 38 धावा केल्या. त्यात 3 चौकार ठोकले. नाशिक स्टार संघाकडून साक्षी सूर्यवंशी हिने व वैभवी हिने एक-एक गडी बाद केला.
194 धावांचे मोठे आव्हान घेऊन उतरलेल्या नाशिक स्टार संघाने अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा बिनबाद 14 धावा केल्या होत्या. दरम्यान, ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.