नाशिक :– फादर्स डे निमित्त केक तलवारीने कापणे एका इसमास चांगलेच महागात पडले आहे.

पंचवटीतील फुलेनगर भागातील शांताराम देवराम गुरगुडे (वय 44) याने फादर्स डेच्या दिवशी तलवारीने केक कापून फादर डे साजरा केला. ही घटना पोलीस अंमलदार महेश साळुंके यांना समजली. त्यांनी गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार सुरेश मालोदे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, आसिफ तांबोळी, नाजीम खान पठाण, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ आदींनी त्यास ताब्यात घेतले.
केक कापलेली तलवार त्याने आपल्या घरात पलंगाखाली लपवून ठेवली होती, ती काढून दिली. बेकायदा हत्यार बळगल्यावरून त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.