मनमाड – कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी मनमाडकर आक्रमक

मनमाड (नैवेद्या कत्ते) :- नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड – गोदावरी एक्सप्रेस धुळ्याला पळविण्यात आल्याने चाकरमानी व प्रवाशी वर्गात तीव्र नाराजी असून संतप्त प्रवाशांनी शहरातून मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

रेल्वे प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती बांधून आणि हातात निषेध फलक घेवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केले.यावेळी आंदोलकांच्यावतीने रेल्वे स्थानक प्रबंधक नरेश्वर यादव यांना निवेदन देण्यात आले.

एक लढा हक्काच्या गोदावरी एक्सप्रेससाठी अशी साद घालत आम्ही सर्व मनमाडकरातर्फे मनमाड जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस मनमाडकरांची जिवनवाहीनी बेकायदेशिर रित्या बंद केल्याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी सायंकाळी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी “वाहा रे अच्छे दिन,जनता त्रस्त रेल्वे प्रशासन मस्त,गोदावरी एक्सप्रेसची मागणी पूर्ण करा नाहीतर खूर्चाच्या खाली करा, गोदावरी एक्सप्रेस हक्काची नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही गोदावरी एक्सप्रेस घेतल्याशिवाय राहणार नाही, कोरोना प्रादुर्भाव फक्त गोदावरी एक्सप्रेस वरच, बाकी गाड्या व रेल्वे प्रशासन आहे तोऱ्यावरच अस आशाच्याचे हातात निषेध फलक घेवून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चा सुरुवात झाली.शहरातील विविध मार्गाने मोर्चा मार्गस्थ होवून मनमाड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर समारोप झाला.

यावेळी माजी नगरध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, मनसेचे सौ. स्वाती मगर, रिपाईचे गुरुकुमार निकाळे, अॅड. निखील परदेशी आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.मनमाड – मुंबई गोदावरी एक्स्प्रेस पुर्ववत सुरू करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या मोर्चात प्रवासी संघटनेचे नरेंद्र खैरे ,राहुल शेजवळ, मुकेश निकाळे ,संदीप व्यवहारे, माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक ,सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अरुण सोनवणे आणि सर्व स्तरातील नागरिक प्रवासी नियमित प्रवास करणारे चाकरमाने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.मनमाड रेल्वे प्रवासी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले होते.

चौकट : या मतदार संघाचे मंत्री व खासदार डॉ. भारती पवार यांना जिल्हा परिषद सदस्या पासून ते थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मनमाडकरांनी संधी दिलेली आहे.त्यांनी आपले पूर्ण वजन वापरून ही गाडी त्यांनी त्याच वेळेस सुरू करण्याची गरज होती,पण त्यांनीही दाखल घेतली नाही,याचा निषेध करण्यात आला.यावेळी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका करण्यात आली यापुढे मनमाडकर अन्याय सहन करणार नाही गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू व्हावी या मागणीसाठी मनमाडकर पूर्ण शक्तिनिशी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.

येत्या पंधरा दिवसात रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेस सुरू करावी, अन्यथा समस्त मनमाडकर तीव्र आंदोलन करतील.याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी ,असा इशाराही यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!