नवी दिल्ली : येथील लॉरेन्स रोड औद्योगिक परिसरामध्ये फुटवेअर कारखान्यात भीषण आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्यामधून धूर निघत असल्याचे पाहून तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली आहे. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे.

युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
https://twitter.com/ANI/status/1597126037812703234?s=20&t=G1peKG8Ry_f96mY_LSGk8g