मुंबई हल्ल्याच्या “या” मास्टरमाइंडला पाकमध्ये अटक

इस्लामाबाद (भ्रमर वृत्तसेवा) :-2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानने अटक केली असून, त्याला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी साजीद मीर मुंबईतच ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

साजिद मीर हा एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतला महत्वाचा दहशतवादी आहे. पाकिस्तानने वारंवार साजिद मीर पाकिस्तानात नसल्याचे सांगितले होते. त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकिस्तान सरकारने केला होता. मात्र आता त्याला अटक करण्यात आली असून, लाहोर न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानला आपला जुना दहशतवादाचा कलंक पुसून काढण्यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आली, अशीही शक्यता आहे.

अमेरिकन एजन्सी एफबीआयने साजिद मीरवर पाच लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश जवळपास 12 वर्षांपासून त्याचा शोध घेत आहेत. साजिद मीर हा संयुक्त राष्ट्र (णछ) हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. साजिद मीर हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सुत्रधार आहे. या हल्ल्यात सुमारे 170 लोक मारले गेले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय, अमेरिकन आणि जपानसह अनेक ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता.

एफबीआयच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, साजिद मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे. एका माजी पाकिस्तानी अधिकार्‍याने सांगितले की, पाकिस्तानने भारत आणि अमेरिकेला सांगितले की मुंबई हल्ल्यातील आरोपी साजिद मीर एकतर मरण पावला आहे किंवा त्याचा ठावठिकाणा माहित नाही. मात्र, मीरच्या अटकेबाबत पाकिस्तानने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

एफबीआयचा दावा आहे की मीरने 2008 ते 2009 दरम्यान डेन्मार्कमधील वृत्तपत्र आणि त्याच्या कर्मचार्‍यांवर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला होता. 2011 मध्ये शिकागो कोर्टाने त्याच्यावर दहशतवादाचा आरोप लावला होता. डिसेंबर 2021 मध्ये, यूएस स्टेट डिपार्टमेंटने मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून साजिद मीरचे नाव दिले. तो पाकिस्तानात मुक्तपणे राहतो, असेही सांगितले. वॉशिंग्टनमधील पाकिस्तानचे माजी राजदूत आणि सध्या वॉशिंग्टनमधील हडसन संस्थेत दक्षिण आणि मध्य आशियाचे संचालक हुसैन हक्कानी म्हणाले की, पाकिस्तानने आता ग्रे लिस्टमधून काढून टाकण्याच्या नियमांचे पालन केले आहे. याचा अर्थ असा की काही भारतविरोधी जिहादी नेते ज्यांच्याबद्दल पाकिस्तानने यापूर्वी माहिती नाकारली होती त्यांना आता शोधून ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!