महापालिका निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेल्या प्रभागरचनेत प्रभाग 6 मध्ये काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर यांसारखी प्राचीन व पावन मंदिरे, गोदाघाटासह, दुसर्या बाजूला पेठ रोड, ढिकलेनगरसारखा नवीन विकसित नाशिकचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रभागात नवीन प्रभागरचनेत काही जुन्या दिग्गजांच्या प्रभागाचा भाग आला असला, तरी मंदिरे व गोदाघाटाचे पावित्र्य जपतानाच गावठाणासह नवीन भागालाही आवश्यक त्या नागरी सुविधा देऊन उत्कृष्ट प्रभाग म्हणून आपल्या कारकीर्दीत लौकिक कायम राखला जाईल, असा विश्वास भाजपचे प्रभाग 6 मधील इच्छुक उमेदवार महेश भगीरथ महंकाळे यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माझे कार्य, माझे संकल्पना’ या दैनिक भ्रमरने उपलब्ध केलेल्या व्यासपीठावर आपल्या संकल्पना सांगताना महेश महंकाळे यांनी प्रभाग 6 मधून मनपा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, असे स्पष्ट केले.
महेश महंकाळे हे भाजपचे युवा नेते असून, भाजप पंचवटी मंडल कोषाध्यक्ष व भाजप तपोवन मंडल सरचिटणीस अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांनी सांगितले, की प्रभाग क्रमांक 6 हा संमिश्र नागरी वस्तीचा आहे. त्याचप्रमाणे धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या नाशिक शहराचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून या परिसराकडे बघितले जाते. रामकुंड, काळाराम मंदिर परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा व नाशिक दर्शनांतर्गत विविध स्थळांची यादी, जाण्याचा मार्ग, उपलब्ध असलेल्या बस आणि रिक्षा सेवा विशिष्ट ठिकाणी काय पाहाल याबाबत यथायोग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पर्यटकांना सोयीस्कर मार्गदर्शन व मदत केंद्र उभारण्याची आपली योजना आहे, तर गावठाण परिसरात अरुंद रस्ते, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, पादचार्यांची गैरसोय, चढउताराचे रस्ते, त्यामुळे पाणी, रस्ते, डांबरीकरण व इतर मूलभूत नागरी सुविधा देताना अनेक अडचणी येतात. त्यावर निश्चित स्वरूपाचा कायमस्वरूपी उपाय काढण्याबरोबरच नागरी सुविधा, यंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याची योजना आहे.
भाजपमध्ये त्यांनी सध्या भाजप तपोवन मंडल सरचिटणीस म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी भाजप पंचवटी मंडल कोषाध्यक्ष व सरचिटणीस ही पदे भूषविली आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या काळात नाशिकरोड भागात विस्तारक म्हणून काम पाहिले आहे, तर भाजप पंचवटी मंडल कार्यविस्तार योजनेत ते सहसंयोजक होते. पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी होणारे विविध उपक्रम आणि आंदोलने यामध्ये माझा नियमित सहभाग असतोच, तर सामाजिक कार्यात सरदार चौक मित्रमंडळाच्या कार्यातून दरवर्षी महाराष्ट्र दिन व गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिर, दीपावलीच्या काळात आदिवासी पाड्यांवर कपडे व फराळ वाटप, तसेच वेळोवेळी सर्वसामान्य जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, अनाथ व गरजू मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप व इतर उपक्रम केले जातात, असे त्यांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागातून गोदावरी नदी वाहत असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी पूरग्रस्त आणि गोदाकाठची लहान-मोठे व्यावसायिक यांच्यासाठी मदत केंद्रे उभारून सहकार्य केले जाते, तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण यासह अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती, ऐन उन्हाळ्यात येणारा रहाड उत्सव आदी उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, तसेच नाट्य आणि संगीत क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. मैत्र जीवांचे फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी दरवर्षी दत्तक योजना राबवून किमान पाच विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च केला जातो.
महेश महंकाळे हे हॉटेल, शेती आणि इन्शुरन्स व्यवसायातून असंख्य नागरिकांशी सुपरिचित आहेत. त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्यही अनेक उदयोन्मुख व्यक्ती व संस्थांसाठी आदर्शवत् ठरले आहे. ते स्वत: सुकेणकर लेन परिसरातील रहिवासी असल्यामुळे नागरी समस्यांची जाणीव आणि नागरी सुविधांची गरज यांचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे.
महेश भगीरथ महंकाळे यांचा कार्यपरिचय
* कोषाध्यक्ष-भाजप, पंचवटी मंडल.
* सरचिटणीस-भाजप पंचवटी मंडल.
* अध्यक्ष-सरदार चौक मित्रमंडळ ट्रस्ट.
* कोषाध्यक्ष-मैत्र जीवांचे फाऊंडेशन
* सचिव-शिवशाही प्रतिष्ठान
* सदस्य-संस्कृती वैभव, नाशिक.
* सदस्य-नववर्ष यात्रा समिती
* जिल्हा संयोजक, हिंदू वीरशैव लिंगायत मंच.मा

महेश महंकाळे यांच्या संकल्पना
- रामकुंड व गोदाघाटाचे पावित्र्य राखणार.
- रामकुंड परिसरात नाशिकच्या धार्मिक व पर्यटनविषयक
- स्थळांची विश्वसनीय माहिती देणारे माहिती केंद्र उभारणे.
- दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन संपूर्ण खर्च केला जातो.
- कोविडच्या काळात गरजूंना धान्य, मास्क, सॅनिटायझर वाटप व आवश्यक ती इतर मदत.
- रक्तदान शिबिर, आदिवासींना कपडे व फराळ वाटप व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम यापुढेही राबविणार.