नाशिक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या भोंगा आंदोलन संदर्भामध्ये आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली. ही आंदोलने करणाऱ्या मनसे आंदोलकांना नाशिक जिल्ह्यातून पंधरा दिवस हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आज रात्री काढले आहेत.