मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका; पत्नीला प्रत्येक महिन्याला “इतके” पैसे देण्याचे आदेश

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. कोलकाता येथील एका न्यायालयाने शमीला गेल्या काही काळापासून वेगळ राहणाऱ्या पत्नी हसीना जहाला प्रत्येक महिन्याला खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. अलीपूर येथील न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला पत्नी हसीना जहाला प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशावर हसीना जहा नाराज आहे. तिने प्रत्येक महिन्याला १० लाख रुपये देण्याची मागणी केली होती. २०१८ साली हसीनाने १० लाख रुपये प्रत्येक महिन्याला देण्याची मागणी करत न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यामध्ये वैयक्तीक खर्चासाठी ७ लाख आणि मुलीच्या देखभालीसाठी ३ लाख रुपयाचा समावेश होता.

कोलकाता येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशावर आता हसीना उच्च न्यायालयामध्ये याचीका दाखल करू शकते. २०१८ साली मोहम्मद शमीच्या आयुष्यात मोठा भूकंप आला होता. पत्नी हसीनाने शमीवर गंभीर आरोप केले होते. तिने शमीवर घरघुती हिंसाचार, हुंडा, मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप केले होते. पत्नीने केलेल्या आरोपावर शमीने स्पष्टीकरण देखील दिले होते. तेव्हापासून शमी आणि हसीना वेगवेगळे राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!