“या” तारखेदरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार

मुंबई : मान्सूनबाबत हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.

देशात जून महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. परंतु, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील देशात पावसाने हजेरी लावली होती. देशातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. देशातील २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 1 जूनपासून देशात सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!