नाशिक जिल्ह्यात “या” तालुक्यात आहेत सर्वाधिक कमी कोरोना रुग्ण

 

 

नाशिक :- जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ५२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७२ ने घट झाली आहे.सद्यस्थितीत १७ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ८०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८६४, बागलाण २८०, चांदवड २७३, देवळा ३८१, दिंडोरी ३७३, इगतपुरी १८९, कळवण २११, मालेगाव २४९, नांदगाव २५२, निफाड ८१८, पेठ १३९, सिन्नर ५७९, सुरगाणा १२१, त्र्यंबकेश्वर १९६, येवला २२६ असे एकूण ५ हजार १५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार ३६५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९२ तर जिल्ह्याबाहेरील १९२ रुग्ण असून असे एकूण १७ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६४ हजार ३२२ रुग्ण आढळून आले आहेत.

*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४१, बागलाण ४९ , चांदवड ६०, देवळा ३८, दिंडोरी ६९, इगतपुरी ३१, कळवण ३२, मालेगाव ३४, नांदगाव ५१, निफाड १३३, पेठ १६, सिन्नर ५०, सुरगाणा २६, त्र्यंबकेश्वर २३, येवला १८ असे एकूण ७७१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.५२ टक्के, नाशिक शहरात ९४.२२ टक्के, मालेगाव मध्ये ९५.७७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.०० टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.४४ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४ हजार २६४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५९ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८०१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

*लक्षणीय :*

◼️४ लाख ६४ हजार ३२२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ३८ हजार ५२१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १७ हजार पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.४४ टक्के.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!