खडकमाळेगावला माथेफिरू मुलाने केली आपल्याच आई-वडिलांची हत्या

लासलगाव :- खडकमाळेगाव येथे माथेफिरू मुलाने आपल्याच आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील दत्तात्रय रामदास सूडके (वय 35) या माथेफिरू मुलाने घरात सुरू असलेल्या वादातून आज सकाळी त्याचे वडील रामदास आनाजी सुडके (वय 60) व आई सरुबाई रामदास घोडके (वय 65) या यांच्यावर मोठ्या काठीच्या सहाय्याने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारी प्रदीप आजगे, कैलास महाजन, योगेश शिंदे यांचे सह घटना स्थळी दाखल झाले. या गुन्ह्यात वापरलेली काठी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच दत्तात्रय रामदास सूडके यास ताब्यात घेतले आहे. घरात वाद सुरू असल्याने रामदास याचे दुसरे लग्न झाले असून दुसऱ्या पत्नीला तीन महिन्यांपूर्वी माहेरी परभणी येथे सोडले आहे. सर्व व्यवहार आईचे हातात होते.

ते आपल्या हाती यावेत म्हणून तो वाद घालत होता अशी माहिती असून घटनास्थळी निफाडचे पोलीस उप अधीक्षक सोमनाथ तांबे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!