नाशिक : माजी आमदार व ज्येष्ठ विधीज्ञ विलास लोणारी यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला मुरलीधर लोणारी (वय 98) यांचे आज दुपारी २.२० वाजता दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5.30 वाजता मेघदूत बंगला, एसटी वर्कशॉप समोर, एन. डी. पटेल रोड, नाशिक येथील निवासस्थानापासून काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात विलास, चंद्रशेखर ही 2 मुले, प्रेमा अनिल चुंबळे ही विवाहित कन्या, सूना, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते मुरलीभाऊ लोणारी यांच्या त्या पत्नी होत्या. लोणारी परिवाराच्या दुःखात भ्रमर परिवार सहभागी आहे.