मंचकी निद्रा संपवून आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरु झाला आहे. दोन वर्षानंतर उत्सव मोठ्या उत्साहात नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची गेली ९ दिवसापासून सुरु असलेली मंचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आल आहे.

यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे ४ वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यापूर्वी देवीची मूर्ती विधिवत पूजा करुन पलंगावरून मूळ सिंहासनावर नेण्यात आली. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने आल्याचे पाहायला मिळत आहेत.

तुळजापुरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे भाविकांचे प्रचंड हाल होत आहे. पावसामुळे प्रज्वलित केलेल्या भवानी ज्योत छत्रीमधून घेऊन न्याव्या लागत आहेत. मात्र भर पावसात देखील भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे. भाविकांच्या प्रचंड संख्येच्या पार्श्वभूमीवर पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिराबाहेर निवारा नाही. तसेच बंदोबस्त करणारे पोलिस बांधव देखील पावसात भिजत आपल्या कर्तव्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!