मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.
एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे.एका महिलेने अमृता यांनी सुंदर दिसण्यासाठी चेहर्यांची प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, की बरे झाले तुम्ही हा प्रश्न विचारला कारण यावरून मला अनेकवेळा ट्रोल करण्यात आले आहे. प्लॅस्टिक सर्जरी ही महागडी गोष्ट आहे. प्लास्टिक सर्जरी एक हिंमतीची गोष्ट आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, ’मी लग्नाआधी एकदाही ब्यूटी पार्लरमध्ये गेले नाही. लग्नाच्या वेळी जो मेकअप करताता तो मी केला होता. देवेंद्रजींबरोबर माझे लग्न झाले. देवेंद्रजींसाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते चेहेरा नव्हे तर मन पाहतात. अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यावर सर्वांनी त्यांचं कौतुक करत टाळ्या वाजवल्या.