येवला तालुक्यात मुस्लिम सुफिंची गोळ्या झाडून हत्या

येवला (दीपक सोनवणे) :- येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसीमध्ये एका अफगाणिस्तानी नागरिक असलेल्या मुस्लिम सुफिंची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने येवला शहरात खळबळ उडाली होती.

काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास येवला शहर पोलीस हद्दीत असलेल्या चिचोंडी एमआयडीसी परिसरात अफगाणिस्तानी नागरिक असलेल्या सुपीक खाजा सय्यद जरीफ चिस्ती (वय 36) यांची गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून 4 अज्ञात व्यक्तींनी पोबारा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना समजताच येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे यांच्या पथकाने धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवी आदींनी देखील तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, या अफगाणिस्तानी सुफिंची येवल्यातल्या चिचुंडी एमआयडीसी परिसरात हत्या का झाली व कशासाठी झाली या सर्व बाबी गुंतागुंतीच्या असून पोलीस याचा कसून शोध घेत आहे. प्रथमदर्शनी हा खून प्रोपर्टीच्या वादातुन झाल्याची माहिती पोलीस सूत्रणनी दिली. रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅब तज्ञांना पाचारण करण्यात आले असून मयतास येवला शहर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी देण्यात आले आहे. शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून मृतदेह तपासणीसाठी येवला शहर पोलिसांसमवेत नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!