मुंबई :- रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा आज रिलायन्स उद्योग समुहाकडून करण्यात आली. आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काल रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीतच रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. २७ जूनला मुकेश अंबानी यांनी तत्काळ अंमलबजावणीच्या प्रभावाने राजीनामा दिला. यानंतर आकाश अंबानींच्या नियुक्तीचा निर्णय झाला.

रिलायन्स संचालक मंडळाने याशिवाय पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी ५ वर्षांसाठी नियुक्ती केली
आहे. रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
https://twitter.com/ani_digital/status/1541760494939545601?t=XaVEIfC5CENnKY48S2gDuQ&s=19