नाशिकमध्ये पुन्हा खून : उद्योजकाची तलवार आणि कोयत्याने भरदिवसा हत्या

 

नाशिक (प्रतिनिधी) :- अंबड औद्योगिक वसाहतीमधील कंपनीबाहेर आज सकाळी साडेदहा वाजता उद्योजकावर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी तलवार आणि कोयत्याने हल्ला करत त्यांचा खून केल्याच्या घटनेने नाशिक हादरले आहे.

नंदकुमार आहेर (वय 50 रा. महात्मानगर) हे मयत झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर वीस वर्षाच्या आतील असल्याचा अंदाज असून त्यांचा शोध सुरू आहे. नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर हे कंपनीत गेले असताना प्रवेशद्वारावर कारमधून उतरत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या तिघा दुचाकीस्वारांनी आहेर यांच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. अधिक रक्तस्त्रावामुळे आहेर जागीच कोसळले. आवाज ऐकून कंपनीतून धावत आलेल्या कामगारांनी त्वरित उपचारासाठी आहेर यांना रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अंबड पोलिसांसह गुन्हे शाखा व आयुक्तालयाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मे महिन्यात सहा आणि जूनमध्ये दोन खून झाल्याने नाशिक हादरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!