नाशिक (प्रतिनिधी) :- बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवर्याने तिला ड्रममध्ये बुडवून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की मालेगाव शहरातील रमजानपुरा भागात अब्दुल वफा अब्दुल रहमान हा त्याच्या पत्नीसमवेत राहत होता. त्या दोघांमध्ये नेहमी तिच्या चारित्र्याच्या संशयावरून भांडणे होत असत. या भांडणात तो अनेक वेळा पत्नीला मारहाण करीत असे. दि. 21 जुलै रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा अब्दुल रहमानने पुन्हा पत्नीशी वाद घालून तिला मारहाण केली. नंतर तेथेच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये तिला बुडवून ठार केले.
या प्रकरणी संशयित अब्दुल वफा अब्दुल रहमानविरुद्ध अदनान खान यांच्या फिर्यादीनुसार रमजानपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.