नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटीत एका युवकाच्या हत्येची घटना ताजी असतानाच विल्होळी शिवारात आज (दि. २३) सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारातील हॉटेल हॉलीडेच्या समोर महामार्गालगत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचल्याने संशयास्पद मृत्यू असल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रथमदर्शनी हा खून असल्याचे दिसत असले तरी अद्याप याबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही.