नांदगाव :– मुलगा मनोरुग्ण असल्याने स्वतःच्याच पोटच्या मुलाची आईने सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जनाबाई अप्पा पेंढारे हिचा मुलगा जनार्दन अप्पा पेंढारे हा वेडसर आहे. त्याचबरोबर त्याला फीट येत असल्याने तो तिला खूप त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून त्याचा कायमचा काटा काढून टाकायचा असे तिने ठरविले. त्यानुसार तिने समाधान दौलत भड (रा. पळाशी, ता. नांदगाव, ह.मु. ढेकू बंधाऱ्याजवळ) याला 15000 रुपयांची सुपारी देऊन तिच्या मुलाची हत्या करण्यास सांगितले.
समाधानने जनाबाईच्या घरात असलेल्या लहान लोखंडी पहारीने जनार्दनच्या डोक्यात वार करून त्याला ठार मारले. कोणाला हे समजू नये म्हणून जनार्दनचे प्रेत एका प्लास्टिक च्या गोणीत भरून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने साईनाथ झब्बू राठोड यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.