नांदगांव (प्रतिनिधी) :– तालुक्यातील तळवाडे येथे काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने वीज पडून दोन बैलांसह एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
काल सायंकाळी पाच वाजेनंतर पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वीज अंगावर पडल्याने तळवाडे येथील शेतकरी शांताराम सकाहरी निकम (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला दिवसभरात शेतीची मशागतीचे कामावरून घरी परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली.
यात निकम यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासह दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे निकम कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.