नाशिक (प्रतिनिधी) :- येथील प्रख्यात सुलेखनकार तथा चित्रकर्मी नंदू गवांदे यांचे आज दुपारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते.

सोमवारी पहाटे नंदू गवांदे यांचे ब्लड प्रेशर अचानक वाढल्यामुळे त्यांना श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. काही वेळात त्याचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणणार आहेत. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

नंदूजींनी जे जे मधून उपयोजित कला शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी सुलेखन कलेतून आपले वेगळं पण सिद्ध केले, त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेला आपल्या सुलेखन कलेतून साज चढवला होता. त्यांची याच कवितांची डायरी प्रसिद्ध झाली होती. गेल्या रविवारी त्यांच्या मार्गदर्शनात व्यक्तिचित्रण कार्यशाळा पार पडली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. सोमवारी त्यांना श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या अकाली जाणे कलाक्षेत्रात अनेकांनी चटका लावून गेले. एका चांगल्या कलावंताची अशी अकाली एक्झिट झाल्याने कला क्षेत्रातील मान्यवराणी हळहळ व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.