नाशिक (प्रतिनिधी) : बंद घरातून अज्ञाताने पावणे सहा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याची घटना चांदवड तालुक्यात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील आसर खेडे मतेवाडी शिवारात किरण महाले कुटुंबासह राहतात. ते २२ जानेवारी रोजी कार्यक्रमानिमित्त चांदवड येथे गेलेले असतांना अज्ञाताने कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.

घरातील कोठीत ठेवलेली २ लाख ७५ हजाराची रोख रक्कम, २० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, एक लाख रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत व एक लाख ५० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गाठले, असा एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
किरण महाले यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करीत आहेत.