नाशिक (प्रतिनिधी) : भरधाव स्कॉर्पिओच्या चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेला युवक ठार झाल्याची घटना मखमलाबाद येथे घडली.
फिर्यादी काळू देवराम गायकवाड (रा. मु. पो. आंबेगण, ता. दिंडोरी) यांचा भाऊ अनिल देवराम गायकवाड (वय ३५) व त्यांचा मित्र असे दोघे जण एमएच १५ सीएफ ६६७५ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने येत होते. त्यावेळी मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोडवरील इरिगेशन कॉलनीसमोर भरधाव आलेल्या एमएच १५ डीएल ६५०५ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीवरील चालक सुरेश निवृत्ती तिदमे याने दुचाकीला धडक दिली.

त्यात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनिल गायकवाड याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.