नाशिक (प्रतिनिधी) :- माहेरून 15 लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करणार्या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही दि. 12 एप्रिल 2021 ते दि. 17 जुलै 2021 दरम्यान पुणे येथे पती, सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यासह एकत्र कुटुंबात सासरी नांदत होती. या सर्वांनी संगनमत करून विवाहितेला आईवडिलांनी लग्नात दिलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करून घरगुती कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.
वारंवार होणार्या या छळाला कंटाळून पीडित विवाहितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.