नाशिक (प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन फिर्यादी यांची मुलगी ही अज्ञान असून, तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आरोपी अजित चंद्रकांत भोर (वय 23, रा. आहुर्ली) याने “तू मला खूप आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करीन,” असे सांगून तिच्यावर दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 24 जून 2022 दरम्यानच्या कालावधीत तिच्यावर रात्रीच्या वेळी आहुर्ली शाळेच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर, तसेच आहुर्ली गावातील पाण्याच्या टाकीजवळ अत्याचार करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हे, तर आरोपी भोर हा वेळोवेळी तिला फोन करून त्रास देत होता.
ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी अंबड पोलीस ठाण्यात अजित भोर याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.