नाशिक (प्रतिनिधी) :- सातपूर परिसरातील वेगवेगळ्या एटीएम मशीन्सची छेडछाड करून तोडफोड करून त्यातून पैसे काढून बँकेकडे तक्रार करणार्या परप्रांतीय चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की सातपूर परिसरात असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या त्र्यंबक, नाशिकरोड, पपया नर्सरीजवळ, सातपूर येथील एटीएम केंद्रात आरोपी सनी राजेश कुशवाह (वय 19), श्रीराम गोरेलाल गौतम (वय 19, दोघेही रा. करबीगवॉ, उत्तर प्रदेश), अभिषेक धनराजसिंग चौहान (वय 20, रा. फरदेशपुरा, उत्तर प्रदेश) व अंशू रमेशचंद्र कुशवाह (वय 24, रा. नरवल, जि. कानपूर) या चौघांनी संगनमत करून महाराष्ट्र बँकेच्या एटीएम रुममध्ये फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला.
कार्ड मशीनमध्ये टाकून पैसे काढून लगेचच मशीनचीच स्क्रीन असलेला डिस्प्ले हुड जोरात ओढून एटीएमचे नुकसान केले. दरम्यान, एटीएममधून पैसे काढूनदेखील पैसे न मिळाल्याबाबत संबंधित बँकेस ऑनलाईन तक्रार दाखल करून पुन्हा बँकेकडे पैसे घेऊन बँकेची फसवणूक केली. याची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या चारही आरोपींची अंगझडती घेतली असता सातपूर महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मशीनची छेडछाड करून दहा हजार रुपये काढल्याची पावती मिळून आली, तसेच त्यांचे साथीदार अभिषेक चौहान व आशू कुशवाह हे त्यांना अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी मदत करीत असल्याची कबुली त्यांनी दिली.
या प्रकरणी सुनील निवृत्ती थोरात (रा. मानस बंगला, स्वामी जनार्दननगर, शिंदेनगर, मखमलाबाद रोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे करीत आहेत. प्रकरणी मशीनची मोडतोड करून त्यातील पैसे काढले. जाऊन फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्रवेश करून एटीएम कार्ड वापरून पैसे काढून लगेच मशीनचा स्क्रीन असलेला डिस्प्ले हूड जोरात ओढून एटीएमचे नुकसान केले. दरम्यान, त्यांनी एटीएममधून पैसे काढूनदेखील पैसे न मिळाल्यानेदेखील संबंधित बँकेस ऑनलाईन तक्रार दाखल करून पुन्हा बँकेकडून पैसे घेऊन बँकेची फसवणूक केली.
ही माहिती कळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांनी सातपूर महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून मशीनची छेडछाड करून दहा हजार रुपये काढल्याची पावती मिळून आली, तसेच त्यांचे साथीदार अभिषेक चौहान व अंशू कुशवाह हे दोघे जण त्यांना अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी मदत करीत असल्याची कबुली गौतम व कुशवाह यांनी दिली. या प्रकरणी सुनील निवृत्ती थोरात यांच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे करीत आहेत.