नाशिक (प्रतिनिधी) :- मुलीला जबरदस्तीने घरात डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी कुणाल जगताप (रा. मोरे हॉस्पिटलसमोर, पवननगर, सिडको, नाशिक) याने दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 30 जून 2022 या कालावधीत एका मुलीला तुझ्या वडिलांना व भावाला मारून टाकीन, अशी धमकी वारंवार देऊन तिला त्याच्या घरी जबरदस्तीने नेले.

त्यादरम्यान मुलीला धमकी देत वारंवार घरात डांबून ठेवत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर वारंवार होणार्या या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कुणाल जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.