Home क्राईम ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी चार तासांत २०८ जणांवर गुन्हे

ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी चार तासांत २०८ जणांवर गुन्हे

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा :
ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी नाशिक परिक्षेत्रात अवघ्या चार तासांत २०८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी नाशिक ग्रामीण मध्ये १४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिली.

दारू पिऊन गाडी चालवण्यावर वचक निर्माण होण्यासाठी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी (दि. २४ रोजी) नाशिक परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हि ड्रंक अँड ड्राइव्ह हि मोहीम राबविली. यामध्ये रात्री आठ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यत म्हणजेच अवघ्या चार तासांत २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. अहमदनगर ४७, जळगाव, ७०, नाशिक ग्रामीण १४, धुळे ३५, नंदुरबार ४२ अशी कारवाई करण्यात आली आहे.

ड्रंक अँड ड्राइव्ह च्या या विशेष मोहिमेमुळे मद्यधुंद वाहन चालकांवर वचक निर्माण होऊन त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये नक्कीच घट होईल, असा आत्मविश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. येणाऱ्या दिवाळी, नाताळ आणि नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर हि मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार आहे.
सणांच्या कालावधीत कोणाही निरापराधास अशा घटनांमुळे आपला जीव गमवावा लागू नये हा उद्देश या मोहिमेचा असल्याचे मत पोलीस उपमहानिरीक्षक पाटील यांनी व्यक्त केले.