लासलगाव । भ्रमर वृत्तसेवा : निफाड येथील युवक अमोल त्र्यंबक मवाळ (२४) यास नवसारी ता मालेगांव शिवारात बोलावुन त्याचा विहरीत ढकलुन देत खुन केल्याप्रकरणी योगेश शिवाजी मोरे यांस आजीवन सश्रम कावासाची शिक्षा मालेगावंचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी वाय गौड यांनी सुनावली आहे तर अन्य संशयिताची खटल्यातुन मुक्तता केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की निफाड येथील युवक अमोल त्र्यंबक मवाळ हा २८ मार्च २०१० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता खुलताबाद येथे एम एच १५ बी एन ८४२८ अल्टो कार घेऊन जात असल्याचे सांगितले मात्र तो परत आला नाही त्याचा फोन बंद आला नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र तो मिळुन आला नव्हता २ एप्रिल २०१० रोजी मनमाड पोलिस पोलिसांना त्याचे प्रेत नवसारी शिवारातील विहिरीत सापडले होते त्याची ओळख पटविण्यात आल्यावर अमोल याचा घातपात करुन त्यास जीवे ठार मारल्याची तक्रार अमोलचा भाऊ अविनाश मवाळ याने मनमाड पोलिस ठाण्यात नोंदविली गुन्ह्याच्या तपासात अमोल यास प्रेमिकेला भेटण्याचे निमित्ताने योगेश शिवाजी मोरे व शांताराम भगवान काकळीज यांनी नवसारी शिवारात बोलावले व तेथेच त्यास विहरीत ढकलुन देत खुन केला.
तसेच अमोलकडे असलेली अल्टो कार योगेश मोरे याचेकडे मिळुन आली होती त्यावरुन भादवि कलम ३०२,२०१अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याचे आरोपपत्र सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलिप ठोंबळ यांनी मालेगाव सत्र न्यायालयात दाखल केले सदर खटल्यात विशेष सरकारी वकिल अँड व्ही एन हाडपे यांनी सरकार पक्षातर्फे एकुण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली व प्रभावी युक्तीवाद केला न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी योगेश शिवाजी मोरे यास दोषी ठरवत न्यायालयाने भादवि कलम ३०२ अन्वये आजीवन सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास ,भादवि कलम २०१ अन्वये पाच वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे तर शांताराम भगवान काकळीज याची सदर खटल्यातुन निर्दोष मुक्तता केली आहे.
न्याय मिळाल्याचे समाधान
माझा मुलगा अमोल याचा मारेकरी शोधुन त्यास शिक्षा देण्याइतपत पुरावे संकलित करणारे पोलिस अधिकारी तसेच न्यायालयात बाजु मांडणारे सरकारी वकिल यांचेप्रती कृतज्ञता आहे अकरा वर्षांचा संघर्षमय काळात लढुन न्याय मिळाल्याचे आम्हा कुटुंबियांना समाधान आहे
त्र्यंबक मवाळ (अमोलचे वडिल)