नाशिक (प्रतिनिधी) :- शेतजमिनीची मोजणी करण्याच्या मोबदल्यात येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापक योगेश पंडित चौधरी आणि छाननी लिपिक योगेश विजय कातकाडे यांनी 50 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

एका शेतकर्याची शेतजमीन मोजून देण्यासाठी या दोघांनी 80 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती त्यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याने ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले.

दोघां विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.