Nashik : तिकिटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने “इतक्या” लाखाची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी) : रेल्वे तिकिटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने अज्ञात इसमाने महिलेच्या क्रेडिट कार्डावरून डिजिटल गोल्ड खरेदी करून 1 लाख 35 हजार रुपयांची रोकड काढून फसवणूक केल्याची घटना घडली.

फिर्यादी गौरी गिरीश कुलकर्णी (वय 51, रा. अश्‍विननगर, सिडको) यांना रेल्वे तिकिटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने अज्ञात इसमाने फोन केला. “मी रेल यात्री येथून बोलतोय,” असे सांगून मोबाईलवरून बोलणार्‍या अज्ञात इसमाने संपर्क साधला. त्यानंतर कुलकर्णी यांनी फोन करून त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डावरून, तसेच टीमव्हूअर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

या अ‍ॅपच्या माध्यमातून अज्ञात इसमाने कुलकर्णी यांच्या संमतीशिवाय डिजिटल गोल्ड खरेदी करून ते दुसर्‍या व्यक्‍तीस विक्री करून फिर्यादी यांची 1 लाख 34 हजार 998 रुपयांची फसवणूक केली, तसेच कुलकर्णी यांच्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅप्लिकेशनचा कंट्रोल त्याच्याकडे असल्याने त्यावर इतर कोणत्या तरी अज्ञात व्यक्‍तीचे अकाऊंट जोडून डिजिटल गोल्ड खरेदी केले.

हा प्रकार दि. 5 व 6 नोव्हेंबरदरम्यान घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बगाडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!