आनंदाची बातमी : नाशिक – हैदराबाद व नाशिक – दिल्ली विमानसेवा “या” तारखेपासून सुरू होणार

नाशिक – कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

नाशिक – हैदराबाद विमानसेवा येत्या २२ जुलै तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार असून आजपासून लॉनलाईन तिकिट बुकींग प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. सदर विमानसेवा स्पाईस जेट कंपनीकहून पुरवण्यात असून नाशिक -हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक -दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. नाशिक -हैद्राबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने व्यापारी, उद्योजक उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र शासनाच्या उडान 2 योजनेअंतर्गत नाशिक शहर देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते.यासाठी खासदार गोडसे यांनी वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवला होता. तत्कालीन मंत्री महोदय आणि नागरी वाहतूक प्रशासनाकडे गोडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता .विमानसेवेसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई मंत्रालयासमोर आंदोलनही केले होते. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी नाशिक येथील ओझर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला होता. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी आणि उद्योजकांकडून या हवाई विमानसेवेला दोन वर्ष भरभरून प्रतिसाद मिळाला होता.परंतु कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती.

विमानसेवा बंद झाल्याने नाशिकसह धुळे, जळगाव आणि अहमदनगर येथील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक – हैदराबाद, नाशिक – दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खासदार गोडसे यांनी काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा येत्या २२ जुलै पासून तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती स्पाईस जेट प्रशासनाने खा. गोडसे यांना कळविली आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा शनिवार वगळता रोजच तर नाशिक – दिल्ली विमानसेवा रोजच उपलब्ध असणार आहे. हैदराबाद – नासिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे.

दिल्ली -नाशिक हे विमान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी टेक- अप होणार आहे. नासिक – हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता 80 असणार असून हा प्रवास अवघ्या 90 मिनिटांचा रहाणार आहे. तर नाशिक -दिल्ली विमानात विमानात 189 प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!