Nashik : शहरातून “इतक्या” मुलांचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी) : शहर परिसरातून काल एका मुलीसह मुलाला अज्ञात इसमांनी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेत त्यांचे अपहरण केल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.

अपहरणाचा पहिला प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी पुरुषाची नात खाली जाऊन पाण्याची बादली घेऊन येते, असे सांगून गेली. ती अद्याप घरी परतली नाही. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाची तरी फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार सी. बी. एस. परिसरात घडला. फिर्यादी महिलेचा मुलगा दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अकोला येथून घराकडे बसने प्रवास करून येत असताना तो घरी परतला नाही. या मुलाला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेत फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून त्याचे अपहरण केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!