अंबड पोलिसांनी केला ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : अंबड पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन आरोपींकडून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 16 मोबाईल व एका मोटारसायकलीचा समावेश आहे.

याबाबत माहिती अशी, की अंबड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 380, 411, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, अनिरुद्ध येवले, नितीन सानप, हेमंत आहेर, मच्छिंद्र वाघचौरे, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, प्रमोद काशीद, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे व प्रशांत नागरे यांच्या पथकाने आरोपी सूरज नामदेव गायकवाड (वय 31, रा. निनावी, पो. पिंपळगाव डुकरा, ता. इगतपुरी, जि. नाशिक), प्रथम राजेश छाजेड (रा. कल्याणी अपार्टमेंट, काठे गल्ली, नाशिक) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत त्यांच्याकडून 45 हजार रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त करून तो ऐवज अंबड पोलिसांत जमा केला, तसेच अंबड पोलीस ठाण्यात दाखल दुसर्‍या गुन्ह्यात इर्शाद रईस शहा (रा. अंबड, नाशिक) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, पोलीस शिपाई येवले, नितीन सानप, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, मच्छिंद्र वाघचौरे, राकेश राऊत, प्रमोद काशीद, मुकेश गांगुर्डे, योगेश शिरसाठ, तुलसीराम जाधव व प्रशांत नागरे अशांनी आरोपी समाधान देवीदास निकम (वय 26, रा. अंबिका स्वीट्समागे, अशोकनगर, सातपूर, मूळ रा. पिंजारी चाळ, स्टेशन रोड, धुळे) याला अटक करून त्याच्याकडून 1 लाख 68 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल हस्तगत केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे व पोलीस शिपाई श्रीकांत सूर्यवंशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!