Nashik : महिलेच्या गळ्यातील “इतक्या” तोळ्याचे मंगळसूत्र लंपास

नाशिक (प्रतिनिधी) : लेडीज टेलरकडे पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र मोटारसायकलीवरून आलेल्या अज्ञात इसमाने बळजबरीने खेचून नेल्याची घटना सिडकोत घडली.

फिर्यादी पल्‍लवी आकाश उकार्डे (वय २४, रा. सिम्बायोसिस कॉलेजजवळ, उपेंद्रनगर, सिडको) ही महिला काल दुपारच्या सुमारास तिची नणंद रोहिणी कुंडलिक उकार्डे हिच्यासह घराजवळ असलेल्या लेडीज टेलरकडे पायी जात होती.

त्यावेळी साईग्रामनगरजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारसायकलीवरील दोन अज्ञात इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने उकार्डे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ६२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने खेचले आणि ते दोघे अज्ञात इसम मोटारसायकलीवरून पळून गेले.

या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!