नाशिक महानगरपालिकेचा दणका : बायोवेस्ट रस्त्यावर टाकल्याने “या” हॉस्पिटलला 25 हजारांचा दंड

नाशिक :- हॉस्पिटल मधील बायोवेस्ट रस्त्यावर टाकल्यामुळे मनपाने एका हॉस्पिटलला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हॉस्पिटल मधील बायो वेस्ट (जैविक) कचरा सार्वजनिक रस्त्यावर टाकल्यामुळे मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशान्वये व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली आज शरणपूर रोड वरील डॉ. वसंत दराडे यांच्या पंचवटी हॉस्पिटलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!