नाशिक (प्रतिनिधी) :– आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत आज सकाळी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने काढण्यात आली. सुरुवातीला ही प्रक्रिया कशी असेल याचे सादरीकरण उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी केले.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या थेट नेमून देण्यात येतील. त्या प्रभागांचे जागांचे क्रमांक पुढीलप्रमाणे : 5-अ, 6-अ, 8-अ, 8-ब, 9 अ, 10अ, 13 अ, 16-अ, 17 -अ, 18-अ, 19-अ, 22-अ, 29-अ, 30-अ, 31-अ, 32-अ, 33-अ, 36-अ, 37-अ, 38-अ, 40-अ (एकूण जागा-21), तसेच 14 जागांसाठी आरक्षण सोडत (19 जागांमधून) 4-ब, 39-ब,24-ब, 25-ब, 23-ब, 42-ब, 15-ब, 22-ब, 41-ब, 20-ब, 35-ब, 14-ब, 43-ब, 26-ब. या सर्व जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
