नाशिक (प्रतिनिधी) – सण आणि उत्सव उत्सव काळात सोशल मीडिया वर वादग्रस्त पोस्ट पाठविणाऱ्या सात जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की नागरिकांनी अशा कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर की टाकू नये जेणेकरून समाजामध्ये वाद निर्माण होतील. पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सध्या सुरू असलेले सण-उत्सव यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना सांगितले की, नाशिक ग्रामीण जिल्ह्यात चाळीस ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दोन अप्पर पोलीस अधीक्षक, सहा पोलीस उपअधीक्षक, 31 पोलीस निरीक्षक, 128 सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, 1263 पोलीस कर्मचारी, 900 होमगार्ड आणि दोन एसआरपीएफच्या तुकड्या याच्यासह दोन ट्रॅकिंग फोर्स आणि पाच क्यू आर टी प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर की अलीकडच्या काळात आपल्या जिल्ह्याचा संबंध नसलेल्या आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये नको त्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या त्या अतिशय चुकीचे आहे. यावर सायबर पेट्रोलिंग सुरू आहे असे सांगून ते म्हणाले की आतापर्यंत सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मालेगाव येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगून ते म्हणाले की नागरिकांनी अशा समाजामध्ये वाद निर्माण करणाऱ्या पोस्ट पाठवू नये जेणेकरून दोन समाजामध्ये वाद निर्माण होतील याची काळजी घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.