नाशिक (प्रतिनिधी)- नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदशी शिवारात छापा टाकून बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर चालणाऱ्या हॉटेल स्टड फॉर्म वर छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली असून या कारवाईनंतर हुक्का किंग म्हणून घेणारा व्यक्तीदेखील फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाला आनंदवली चांदशी रोडवर असलेल्या स्टड फार्म या हॉटेलमध्ये हुक्का पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना हजार रुपयाचा हुक्का याठिकाणी मिळाला आहे.

तातडीने पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे काही तरुण मंडळींना घेऊन हुक्का किंग म्हणविणाऱ्या एका व्यक्तीकडून ज्या पद्धतीने हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते ते यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाणे मध्ये फहीम अहमद, चिराग रूगवानी, गणेश अंबादास रमेश धात्रक, या आरोपींविरोधात गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी गणेश वराडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव या करीत आहे.