नाशिक (प्रतिनिधी) :- औरंगाबाद येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (एमसीए सिनियर इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने नांदेड संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.

सलामीवीर कर्णधार यासर शेख च्या दमदार नाबाद १४२, तसेच मुर्तुझा ट्रंकवालाने फटकेबाज व धनंजय ठाकुरनेही नाबाद अर्धशतक झळकवल्यामुळे नांदेडच्या २७० धावा नाशिकने केवळ ५३ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात आरामात पार केल्या. निर्णायक विजयासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने आघाडी घेऊन पहिला डाव लगेच घोषित केला. पण खराब सुरुवातीनंतर नांदेडच्या फलंदाजांनी दुसर्या डावात ३ बाद ९९ अशी मजल मारल्यामुळे सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. नांदेडतर्फे कर्णधार शमशुझामा काझी ने पहिल्या डावात शतक व दुसर्या डावात नाबाद अर्धशतक केले.
